फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल) या एसपीव्ही कंपनीची आज (ता.30) पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात नियमित बैठक झाली. यावेळी कंपनीच्या सल्लागाराने फाडफाड इंग्रजीत सादरीकरण केल्याने कंपनी संचालक असलेले महापौर नितीन काळजे भडकले. हे प्रेझेंटेशन समजण्यासाठी ते मराठीत सादर करण्यास त्यांनी सांगितले. मात्र, सल्लागार कंपनीचे अधिकारी बिगरमराठी असल्याने त्यांनी पुढील बैठकीपासून मराठीऐवजी हिंदीत सादरीकरणाचे आश्‍वासन दिले. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली या एसपीव्ही कंपनीच्या संचालक मंडळाची ही बैठक झाली. तिला महापौर, सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक प्रमोद कुटे हे संचालक तसेच पोलिस उपायुक्त (वाहतूक) अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी व पालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते. गायकवाड यांची ही पहिलीच बैठक होती. कारण त्या स्थायी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर "स्मार्ट सिटी'च्या संचालक मंडळाची प्रथमच बैठक झाली. बैठकीत केपीएमजी या "स्मार्ट सिटी'च्या सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही, त्याचे पोल, हॉटस्पॉट याबाबत अस्खलित इंग्रजीतून सादरीकरण केले. महापौरांचे शिक्षण बारावी, तर स्थायी समिती अध्यक्षांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले असल्याने त्यांना व इतरही संचालकांना ते समजलेच नाही. त्यात प्रकल्प समितीसमोर हे प्रकल्प सादर करण्याऐवजी ते थेट संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आल्याने शांत स्वभाव असलेलेही महापौरही संतापले. त्यांनी सीईओ तथा आयुक्तांना झापले. महापौरांनी प्रेझेंटेशन देणाऱ्या सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही सुनावले. आम्हाला समजले नाही, तर आम्ही काय सूचना देणार, अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्याला पवार व कुटे या इतर संचालकांनीही अनुमोदन दिले. प्रकल्प आढावा समितीत असलेल्या कुटे यांनी स्मार्ट सिटी योजनेत घेण्यात येणारे प्रकल्प प्रथम आमच्यासमोर (समिती) सादर करा, मग ते संचालक मंडळासमोर आणा, असे सुनावले. मराठीत हे सादरीकरण करा, असे महापौरांनी आयुक्त व सल्लागारांना ऐकविले. मात्र, सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांना मराठी येत नाही. त्यामुळे त्यांनी पुढील बैठकीपासून सादरीकरण हिंदीत करू, असे सांगितले आहे.

  • न्यूज़
  • 2018/05/04 05:44:34 NM.
  • 98


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबां.. पूर्ण बातमी पहा.

मा.आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित मावळ.. पूर्ण बातमी पहा.

मोदी-शहांच्या डोक्‍यात काय चालले आहे, हे न समजण्या.. पूर्ण बातमी पहा.

नऊ वर्षात चुकीच्या कामासाठी मी एकही फोन केला नाही .. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

शाहू - फुले - आंबेडकर यांना आदर्श मानत असल्याने फु.. पूर्ण बातमी पहा.

मातंग मुलांच्या मारहाण प्रकरणात मंत्री गिरीश महाजन.. पूर्ण बातमी पहा.

नऊ वर्षात चुकीच्या कामासाठी मी एकही फोन केला नाही .. पूर्ण बातमी पहा.

नाथाभाऊ, तुम्ही कोण ? हिंदुत्ववादी, ओबीसी की बहुजन.. पूर्ण बातमी पहा.

गौरी लंकेश यांच्यावर मीच चार गोळ्या झाडल्या, परशुर.. पूर्ण बातमी पहा.

मी कॅबीनेटमंत्री होणार का, ते मुख्यमंत्र्यांनाच मा.. पूर्ण बातमी पहा.

मोदी सरकारचे कामगार हिताकडे दुर्लक्ष : डॉ. रत्नाकर.. पूर्ण बातमी पहा.

राज ठाकरे यांनी केले आदिवासी पाड्यावर जेवण.. पूर्ण बातमी पहा.

अनिल देसाईंची जानकरांशी जवळीक विधानसभेच्या तिकीटास.. पूर्ण बातमी पहा.

मुंबईतले जीना हाऊस तात्काळ पाडा.. पूर्ण बातमी पहा.