यवतमाळ-वाशिम लाेकसभेसाठी राहुल ठाकरेंची माेर्चेबांधणी

अकाेला : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने ग्राऊंड लेव्हलवर माेर्चेबांधणी सुरू केली अाहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना टक्कर देण्यासाठी नव्या दमाचे नेतृत्व म्हणुन विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे पूत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची रणनीती अाखण्यात येत अाहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून राहुल ठाकरे यांनी मतदारसंघात माेर्चेबांधणीला सुरूवात केली असल्याने अागामी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्ये काट्याची लढत हाेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदारसंघ हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जात हाेता. लाेकसभेच्या झालेल्या 16 निवडणुकांमध्ये तब्बल 12 वेळा या मतदारसंघातून काँग्रेसने विजयी पताका फडकविली हाेती. या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार (कै.) उत्तमराव पाटील यांनी सर्वांधीक सहा वेळा विजयी पताका फडकविली हाेती. मात्र, 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे हरिसिंग राठाेड यांनी उत्तमराव पाटील यांचा पराभव करीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला खिंडार पाडले . या निवडणुकीनंतर हरिसिंग राठाेड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांचा 56 हजार 951 मतांनी पराभव करीत मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीतही खासदार गवळी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव माेघे यांचा पराभव करीत विजय संपादन केला होता . यापूर्वी मतदारसंघात केलेली विकास कामे अाणि सामाजिक समीकरण खासदार भावना गवळी यांच्या जमेच्या बाजु ठरल्या आहेत . मात्र, गेल्या वर्षभरापासून शिवसेनेत खासदार गवळी विरुद्ध महसुल राज्यमंत्री संजय राठाेड गटाचा उफाळून अालेला वाद अागामी निवडणुकीत शिवसेनेसाठी डाेके दुःखी ठरू शकताे. सेनेत वाढत असलेली धुसफूस अाणि केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विराेधी धाेरण काँग्रेससाठी पाेषक ठरणार अाहे. शिवसेनेतील मतभेदांचा लाभ घेत नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची माेट बांधत हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याची रणनिती काँग्रेसने अाखली अाहे. अागामी निवडणुकीत दमदार नेतृत्व म्हणुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना निवडणुकीच्या अाखड्यात उतरविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. त्यादृष्टीनेच राहुल ठाकरे मतदारसंघात विविध अांदाेलने, मेळावे, सभांचा धडाका लावत जनसंपर्क माेहिम राबवुन ग्राऊंड लेव्हलवर माेर्चेबांधणी करीत असल्याने अागामी निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे.

  • न्यूज़
  • 2018/05/04 05:45:55 NM.
  • 83


तुमची प्रतिक्रिया

 सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सोशल मिडीयांचा अवलिया.. पूर्ण बातमी पहा.

फाडफाड इंग्रजी एेकून पिंपरीचे महापौर भडकले..... पूर्ण बातमी पहा.

मा.आमदार दिगंबर भेगडे यांच्या वाढदिवसानिम्मित मावळ.. पूर्ण बातमी पहा.

मोदी-शहांच्या डोक्‍यात काय चालले आहे, हे न समजण्या.. पूर्ण बातमी पहा.

नऊ वर्षात चुकीच्या कामासाठी मी एकही फोन केला नाही .. पूर्ण बातमी पहा.

 संबंधित बातम्या

पवारांच्या बेळगावमधील सभेसाठी जय्यत तयारी.. पूर्ण बातमी पहा.